महिलेचा विनयभंग करून मारहाण, दोघांवर गुन्हा

Beed Crime News | या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे
molestation case
molestation casePudhari
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज : तालुक्यातील एका गावात ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला दगडाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पीडित महिलेच्या तक्रारीवरून डिगांबर ढाकणे आणि त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी पहाटे ५:०० वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरासमोर उभी होती. यावेळी आरोपी डिगांबर विष्णू ढाकणे याने महिलेचा हात धरून विनयभंग केला. "तू माझ्यासोबत चल, मी तुझ्याशी लग्न करतो," असे म्हणत त्याने तिचे कपडे ओढून गैरवर्तन केले. महिलेने प्रतिकार केला असता, आरोपीने तिला उचलून जमिनीवर आदळले आणि दगडाने मारहाण केली. या वादात आरोपीची आई तायनाबाई विष्णू ढाकणे ही देखील सामील झाली. दोघांनी मिळून महिलेला अश्लील शिवीगाळ केली. तसेच, "जर पोलीस ठाण्यात तक्रार केली, तर तुला जिवंत सोडणार नाही," अशी धमकीही दिली.

पोलिसांत गुन्हा दाखल

या छळवणुकीनंतर पीडित महिलेने केज पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून डिगांबर ढाकणे आणि तायनाबाई ढाकणे यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३३७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ७४, ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५२, ३(५) कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस जमादार उमेश आघाव हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news