

केज : केज तालुक्यात एका विवाहित महिलेवर एका तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली आहे. याबाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील एक विवाहित महिला ही शेतात काम करीत असताना जवळ कुणी नसल्याची संधी साधून तिच्या भावकितील एका नराधमाने ज्वारीच्या पिकात तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला. तसेच कोणाला जर सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पीडित महिलेच्या तक्रारी वरून केज पोलीस ठाण्यात त्या नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे तपास करीत आहेत.