

बीड : शहरातील चहाटा फाट्यावर एका कारमध्ये दोन जणांनी व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दिड कोटींचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी दुपारी करण्यात आली.
व्हेल माशाच्या उलटीची विक्री करणारे दोघे बीड शहरात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि बाळराजे दराडे यांना मिळाली होती त्यांनी पोलीस अधीक्षकांना याची माहिती दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांना कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शहाराबाहेरील एका हॉटेलजवळ चऱ्हाटा फाटा येथे शैलेश प्रभाकर शिंदे (वय ३८, हवेली, पुणे) व विकास भीमराव मुळे (वय ३० रा. शिखरवाडी, ता. पाटोदा) या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान व्हेल माशाचा वावर खोल समुद्रात असतो. या माशाच्या कोणत्याही अवयवाचा व्यापारी वापर गुन्हा आहे. हा मासा शारीरिक प्रक्रियेतून उलटी करतो. ती उलटी द्रव स्वरूपात असते. या उलटीला अंबर ग्रीस असे म्हटले जाते. औषध तसेच अत्तर निर्मितीत एक खूप महत्त्वाचा घटक म्हणून व्हेल माशाच्या या उलटीचा वापर केला जात असल्याचे तज्ज्ञ सांगतात. पोलिसांनी या दोघांकडून दिड किलोच्या घरात उलटी जप्त केली आहे.
सध्या या उलटी ची तपासणी करण्यात येतं असून पोलिसांना ही उलटी व्हेलं माशाचीच असल्याचा संशय आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवाजीनगर पोलिसांना व्हेलं सारख्या तस्करीत मोठी कारवाई करण्याची संधी मिळाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक एम. एस. सोन्ने, रवी आघाव आदींनी केली आहे.