

गौतम बचुटे/केज :
आम्ही जोंपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या सोबत असून जर देशमुख आणि परभणीच्या सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळत नसेल तर सत्ता काय कामाची? असे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला. तर धनंजय मुंडेंच्या विषयी बोलताना त्या म्हणाल्या की, काही गोष्टी या नैतिकतेला धरून असतात. धनंजय मुंडे आणि आ. सुरेश धस यांच्या भेटी बाबत मत व्यक्त करताना म्हणाल्या की, त्यांच्या या भेटीची आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. कारण आ. सुरेश धस यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. तसेच सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना म्हणाले होते की, नैतिकता आणि धनंजय मुंडे यांची कधी भेटच झालेली नाही.
खा. सुप्रिया सुळे या दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:०० वा. च्या सुमारास बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेट घेण्यासाठी आल्या होत्या. त्या वेळी त्यांच्या सोबत खा. बजरंग सोनवणे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. संदीप क्षीरसागर, माजी आ. सय्यद सलीम, महेबुब शेख, सचिन खरात, दयानंद स्वामी, डॉ. खळगे हे सोबत होते. संतोष देशमुख यांची पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी, मुलगा विराज, आई शारदा, वडील पंडितराव देशमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना खा. सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, मी पण कुणाची तरी लेक आहे. मी संतोष देशमुख यांच्या आईचे आणि पत्नीचे दुःख पाहिले आहे. त्याने मी व्यथित झाले आहे.
हा राजकरणाचा विषय नसून संतोष देशमुख यांच्या सारख्या कर्तृत्ववान सरपंच म्हणजे राज्याचा लेक गमावला आहे. सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने अधिकार दिले आहेत. आमचा हा लढा माणुसकीच्या नात्याने मी सुप्रिया सुळे हा लढा लढणार आहे. तसेच हे हत्याकांड म्हणजे महाराष्ट्र माणुसकी विसरला की काय? असे वाटते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत; पण ते राज्यातील अशी कृती सहन करणार नाहीत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी खासदर म्हणून नव्हे तर महिला म्हणून मी मुख्यमंत्रींसमोर पदर पसरून देशमुख कुटुंबाच्या न्यायाची विनंती करणार आहे. बीड देशमुख हत्या आणि परभणीच्या सूर्यवंशी प्रकरणात न्याय मिळायला हवा. दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना फाशी व्हायलाच हवी. या प्रकरणी त्या आणि खा. बजरंग सोनवणे सोनवणे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. असे त्या म्हणाल्या. या भेटीत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेवून लोकशाही पद्दतीने न्यायाची मागणी केली. या प्रकरणात जर न्याय मिळाला नाही; सर सत्ता काय कामाची ? असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री आणि महायुतीला लगावला.
गुन्हेगारांना शिक्षा व्हायलाच हवी आणि गुंडागर्दी करणाऱ्यांची सत्तेशी आणि पैशाची मस्ती उतरलीच पाहिजे अशी त्यांची कणखर भूमिका मांडली.
तुम्ही अन्नत्याग करू नका :- दि. २५ फेब्रुवारी रोजी पर्यंत जर फरार आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्यात आली नाही तर ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या बाबत खा. सुप्रिया सुळे यांनी त्यांनी अन्नत्याग आंदोलन न करण्याची विनंती केली. तसेच गरज पडली तर आम्ही अन्नत्याग करू तुम्ही आम्हाला मग कशासाठी निवडून दिले. असेही त्या म्हणाल्या.
व्हिडिओ काढून सीआयडी कार्यालयात वाल्मीक जातोच कसा ? :- वाल्मीक कराड याने आत्मसमर्पण करण्यापूर्वी एक व्हिडिओ काढून पुण्याच्या सीआयडीच्या कार्यालयात जातोच कसा असे म्हणून तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला.
सावंत यांचा मुलगा सापडतो मग कृष्णा आंधळे सापडत कसा नाही ? :- संतोष देशमुख यांची हत्या होवून ६९ दिवस झाले तरी कृष्णा आंधळे हा पोलीसांना कसा काय सापडत नाही. यावर सुप्रिया सुळे यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि तानाजी सावंत याच्या मुलाचे विमान परत आणले जाते. पण कृष्णा आंधळे त्याला राजकीय पाठबळ असल्यानेंतो सापडत नसावा असे म्हणून अप्रत्यक्षपणे त्याला मंत्री धनंजय मुंडे हेच मदत करीत असावेत असा संशय देखील व्यक्त केला.
कुणावरही अन्याय झाला तर माझ्याकडे संपर्क साधा, आता गुंडांना माफी नाही :- येथून पुढे कुणावरही अन्याय आणि हल्ला झाला तर त्यांनी आम्हाला फोन करा. त्यासाठी सुप्रिया सुळे, खा. बजरंग सोनवणे आणि आ. संदीप क्षीरसागर हे त्यांचा समाचार घ्यायला सक्षम आहेत. आता गुंडांना माफी नाही आणि गुंडांना मदत करणाऱ्यांचा आम्ही पर्दाफाश करणार असे खा. सुप्रिया सुळे यांनी आवाहन केले.