वैद्यकीय तपासण्यानंतर वाल्मीक कराडची कारागृहात रवानगी

मकोका कारवाई होताच कराडने पोलिसांकडे केल्या वैद्यकीय तक्रारी
Valmik Karad |
वाल्मीक कराडFile Photo
Published on
Updated on

बीड : पवनचक्की प्रकल्पाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या वाल्मिक कराडवर न्यायालयीन कोठडीनंतर मकोका कारवाई होताच त्याने छातीत दुखणे, दम भरणे आणि चक्कर येणे अशा वैद्यकीय तक्रारी केल्या. पण, त्याच्या वैद्यकीय तपासणी व विविध चाचण्यानंतर त्याला दवाखान्यात अॅडमिट करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिला. त्यामुळे त्याला जिल्हा कारागृहात जावे लागले.

११ डिसेंबर रोजी मस्साजोग येथील अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पासाठी धमकावून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला मंगळवारी (दि.१४) न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली. परंतु, खुन प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने मकोकाची कारवाई करत संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासाठी प्रोड्युस वॉरंट काढून एसटीआयटीकडे ताबा देण्याचा अर्जही मंजूर केला.

सीआयडीचे पथक त्याला घेऊन पोलिस व्हॅनमधून कारागृहाकडे घेवून जात असताना त्याने दम भरतोय, चक्कर येतेय, छातीत दुखतेय अशा वैद्यकीय तक्रारी केल्या. त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉ. कुलकर्णी यांनी त्याची ईसीजी तसेच रक्ताच्या चाचण्या करुन उपचार केले आणि काही औषधेही दिली. परंतु, त्याला रुग्णालयात राहण्याची गरज नसल्याचा निर्वाळा दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news