Santosh Deshmukh Murder Case
संतोष देशमुख हत्या प्रकरण.(Pudhari photo)

Santosh Deshmukh murder case : सरकारी पक्षाकडून व्हिडिओचे पुरावे सुपूर्द

व्हायरल न करण्याचे हमीपत्र, दोषारोप पत्रासाठी घाई न करण्याची मागणी
Published on

Video evidence was submitted by the government party.

बीड, पुढारी वृत्तसेवा: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीच्या वकिलांना व्हिडिओचे पुरावे सरकारी पक्षाकडून शुक्रवारी सादर करण्यात आले आहेत. मात्र हे व्हिडिओ पुरावे व्हायरल होऊ नये असे न्यायालयाने आरोपीच्या वकिलांकडून लिहून घेतले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी (दि. २३) ठेवली आहे.

Santosh Deshmukh Murder Case
Beed News : अनधिकृत बांधकामाविरोधात नगरपालिकेसमोर उपोषण

पुरावे प्राप्त झाले असले तरी पुरावे पाहण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली होती. व्हिडीओचा पेन ड्राईव्ह आम्ही आरोपीच्या वकिलांना दिला असल्याची माहिती सरकारी पक्षाने सांगितले आहे. अपहरण व निघृण हत्या प्रकरणातील हल्ल्याचे व्हिडीओ उच्च न्यायालयाला दिले जातात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नसल्याची बाब कायदेशिर नसून बीएनएससच्या कलम २३० ची पुर्तता झाल्याशिवाय दोषारोप पत्राची घाई अभियोग पक्ष करत असल्याचा मुद्दा आरोपींच्या वकिलांनी मांडला.

दरम्यान, अॅड. उज्वल निकम हे राजकीय पक्षाशी संबंधीत असून त्यांना या केसपासून हटवावे अशी मागणी आरोपी सुदर्शन घुले याच्यासह आरोपींनी न्यायालयाकडे केली पाच आहे. गतवर्षी दि.९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे मस्साजोग जवळून अपहरण करुन त्यांची निघृण हत्या झाली. या प्रकरणात वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे, प्रतिक घुले, सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांच्यावर आरोप ठेवला आहे. या प्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायाधीश व्यंकटेश पाटवदकर यांच्या न्यायालयात सुरु आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत विशेष सहाय्यक सरकारी वकिल अॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.

Santosh Deshmukh Murder Case
केज तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

व्हिसीद्वारे विशेष सरकारी वकिल अॅड. उज्वल निकम सहभागी झाले. हत्या प्रकरणातील आरोपी विष्णु चाटे याच्या जामीन अर्जावर अॅड. सुधीर शहा यांनी युक्तीवाद केला. विष्णु चाटे याचा पहिल्या दोन एफ आयआरमध्ये उल्लेख नाही, तसेच घटनेवेळी तो त्या ठिकणी उपस्थित नव्हता. त्यामुळे त्याला जामीन मंजूर करावा अशी बाजु अॅड. शाह यांनी मांडली. यावरचा निर्णय अद्याप न्यायालयाने दिलेला नाही.

राष्ट्रपतीनियुक्त खासदार; निकम यांचा युक्तिवाद

या प्रकरणातील विशेष सरकारी वकिल एका पक्षाचे खासदार असून त्यांची या खटल्यातील नियुक्ती काही आमदारांच्या शिफारशीवरुन केल्याने त्यांना खटल्यातून हटवावे, अशी मागणी या प्रकरणातील आरोपीच्या वकीलांनी केली. यावर न्यायालयाने उज्वल निकम यांना देखील माहिती दिली. यावर अॅड. उज्वल निकम यांनी माझी नियुक्ती ही राष्ट्रपतींनी केली आहे, मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधीत नाही, आर-ोपींनी दिलेल्या या अर्जाला कोणताही कायदेशीर आधार नाही असे म्हणत हा अर्ज नामंजूर करण्याविषयीची बाजु मांडली.

सुदर्शन घुलेला आली भोवळ

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सकाळी अकरा वाजता सुरु झाली. यावेळी आरोपींच्या ओळख परेडदरम्यान सुदर्शन घुले हा उपस्थित नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. यावेळी कारागृह प्रशासनाकडून त्याला तपासण्यासाठी डॉक्टर आले आहेत, बरॅकमध्ये तपासणी सुरु असल्याचे सांगण्यात आले. यानंतर तासाभराने सुदर्शन घुले हा कारागृहातील व्हीसी रुममध्ये आला परंतु त्याला भोवळ आल्याने तो खाली पडला. जमिनीवर बसूनच त्याने आपली उपस्थिती दर्शवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news