मानसिकता नसली तरी मन घट्ट करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली परीक्षा : वैभवी देशमुख

Vaibhavi Deshmukh: 12 वी परीक्षेच्या पहिल्या पेपरनंतर दिली प्रतिक्रिया
Vaibhavi Deshmukh
वैभवी देशमुखpudhari photo
Published on
Updated on

केज : वडिलांच्या हत्येनंतर मानसिकता नसताना देखील मन घट्ट करून वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी बारावी बोर्डाची परीक्षा दिली आणि वडीला शिवाय पहिल्यांदा परीक्षा केंद्रावर गेल्याची खंत वैभवी देशमुख हिने परीक्षा देवून आल्या नंतर हिने प्रतिक्रिया व्यक्त केली.

बीड जिल्ह्यातील आवादा कंपनीच्या पवन चक्की प्रकल्पाच्या खंडणीच्या प्रकरणातून दोन महिन्या पूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आलेले मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेचा पहिला पेपर सोडविला. परीक्षेनंतर तिने आपली प्रतिक्रिया देताना अत्यंत भावनिक होत म्हटले की, माझा पहिलाच पेपर होता. ज्या वेळेस माझे वडील माझ्या सोबत नव्हते आणि हे तीन तास म्हणजे खूप कठीण होते. आधी तर माझी मानसिकताच नव्हती.

मला पेपर सोडवत असताना प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येते होती. पेपरला जाण्या अगोदर मनात खूप खळबळ निर्माण झाली होती. पण नंतर मी ठरवलं की, नाही; मला पेपर द्यायचा आहे. माझ्या वडिलांचे जे स्वप्न होते. ते मला पूर्ण करायचं आहे. त्यासाठी मला परीक्षा देण्याची पेपर मानसिकता नसली तरी ते कुठेतरी माझं मन एका जागेवर आणून मला वडिलांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी मन अगदी घट्ट करून परीक्षा दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news