Beed Crime|केजमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; घातपात झाल्याचा संशय

जिवाची वाडी परिसरातील घटना
Beed News
केजमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेहFile Photo
Published on
Updated on

केज : केज तालुक्यातील जिवाची वाडी शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना शुक्रवारी (दि.२९) सायंकाळी उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. जिवाची वाडी तलावापासून चिखलबीडकडे जात असलेल्या रस्त्याच्या कडेला या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती संरपंचानी पोलिसांना दिली.

Beed News
Nandurbar Crime : दोंडाईचा कडून नंदुरबार कडे दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

घटनेची माहिती पोलिसांना मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनवणे, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. याबाबत घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याची काम सुरू आहे. या अनोळखी व्यक्तीची कोणाला काही माहिती मिळाल्यास केज पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी केले आहे.

Beed News
Amravati Crime| बडनेरा हत्याकांडाला नवे वळण; बहिणीचा छळ करणाऱ्या भावजीला मेव्हण्यानेच सुपारी देऊन संपविले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news