Beed News : टेम्पोच्या धडकेत दोन भावांसह मामा जागीच ठार

बीड-शिरूर कासार रस्त्यावर झाला अपघात
Beed News
Beed News : टेम्पोच्या धडकेत दोन भावांसह मामा जागीच ठारfile photo
Published on: 
Updated on: 

Uncle and two brothers killed on the spot in tempo collision

बीड, पुढारी वृत्तसेवा : बीड-शिरूर कासार रस्त्यावरील हिवरसिंगा शिवारात मंगळवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत दोन सख्ख्या भावांसह त्यांच्या मामाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Beed News
Beed News : बीड जिल्ह्यात पोलिसांसमोरच दोन शेतकऱ्यांनी केले विष प्राशन

राम शेळके (वय 25, रा. शिरूर -मामा), मंगेश रोहिदास बजगुडे (वय 16) आणि गणेश रोहिदास बजगुडे (वय 20/21, दोघे रा. बालेपीर, बीड-भाचे) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघे दुचाकीवरून शिरूर कासार येथून बीडकडे जात असताना, बीडकडून येणाऱ्या भरधाव टेम्पोने (क्र. एमएच 23 एमव्ही 6023) त्यांना जोराची धडक दिली.

Beed News
Beed News : फिजियोथेरपी महाविद्यालयाचा प्रवेश प्रक्रियेत समावेश करा

धडक एवढी भीषण होती की तिघेही टेम्पोच्या चाकाखाली चिरडले जाऊन जागीच ठार झाले, तर धडकेनंतर टेम्पो रस्त्याखालील खड्यात जाऊन कोसळला. घटनेची माहिती मिळताच शिरूर कासार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व तिन्ही मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात हलवले. बुधवारी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे बालेपीर व शिरूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news