

परळी वैजनाथ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे परभणी दौरा आटोपून धाराशिवकडे जात असताना परळी शहरात शिवसैनिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. छत्रपती संभाजी महाराज चौक तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या स्वागत सोहळ्यात जेसीबीमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.
या स्वागत सोहळ्यास मोठ्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. "कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला" अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.परळीतील नागरिकांच्या वतीने उद्धव ठाकरे यांना श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची प्रतिमा भेट देण्यात आली. ही प्रतिमा स्वीकारताना उद्धव ठाकरे यांनी ती मस्तकाला लावून अभिवादन केले.
अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली जल्लोषात स्वागत
परळी वैजनाथ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांच्या नेतृत्वाखाली स्वागत करण्यात आले. यावेळी अभयकुमार ठक्कर यांच्या सह प्रा.अतुल दुबे, रमेश चौंडे, मोहन परदेशी सतीश जगताप, श्रीनिवास सावजी, मनीष जोशी, लक्ष्मण मुंडे, संजय कुकडे, बबन ढेंबरे, सचिन लोढा, योगेश जाधव, सुरेश परदेशी, सिद्धार्थ गायकवाड,बजरंग औटी, प्रकाश देवकर, कृष्णा बेदरकर ,नरेश मैड, अमित कचरे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली स्वागत
परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे, उपजिल्हाप्रमुख नारायण सातपुते, तालुकाप्रमुख भोजराज पलिवाल शहरप्रमुख राजेश विभुते, युवासेना जिल्हाप्रमुख सोमेश्वर गित्ते व शिवसेना महिला आघाडी, युवासेना आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.