Kaij Fraud Case : ऊसतोड मजूर पुरवठ्याच्या नावाखाली १३.४८ लाख रुपयांची फसवणूक

कल्याण मुंडे विरुद्ध युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Kaij Fraud Case
Kaij Fraud Casepudhari
Published on
Updated on

केज : ऊसतोड मजूर पुरवठा करून देण्याचे आश्वासन देत ट्रॅक्टर मालकाची तब्बल १३ लाख ४८ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी कल्याण बापूराव मुंडे (रा. ताडसोन्ना, ता. बीड) याच्याविरुद्ध युसूफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळ (ता. केज) येथील भीमराव उत्तमराव घुगे हे ट्रॅक्टरद्वारे ऊस वाहतूक व्यवसाय करतात. सन २०२४-२५ च्या ऊसतोड हंगामासाठी त्यांनी कर्नाटकातील बालाजी शुगर फॅक्टरी येथे ऊस वाहतुकीचा करार केला होता. त्यासाठी ऊसतोड मजूर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने १५ मे २०२४ रोजी कल्याण मुंडे याच्यासोबत चर्चा झाली होती.

Kaij Fraud Case
Dombivli Crime | १२ वर्षांपूर्वीच्या अपहृत तरूणाच्या खूनाचा लागला छडा! कथित रीलस्टार सुरेंद्र पाटीलचा भयानक कारनामा 

या बैठकीत १६ कोयते म्हणजेच ३२ ऊसतोड मजूर पुरविण्यासाठी १६ लाख रुपयांचा व्यवहार ठरला. त्यानुसार घुगे यांनी सुरुवातीला दीड लाख रुपये रोख दिले. त्यानंतर विविध टप्प्यांमध्ये ऑनलाइन आणि रोख स्वरूपात एकूण १५ लाख रुपये आरोपीला अदा करण्यात आले.

मात्र, करारानुसार १६ कोयत्यांऐवजी केवळ ६ कोयते (१२ मजूर) उपलब्ध करून देण्यात आले. हे मजूरही काही दिवसांत काम सोडून निघून गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. उर्वरित मजूर पुरविण्याबाबत वारंवार विचारणा करूनही आरोपीने टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, जानेवारी २०२५ मध्ये पैसे परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले होते. मात्र, त्याने रक्कम परत केली नाही किंवा उर्वरित मजूरही उपलब्ध करून दिले नाहीत.

पुरविण्यात आलेल्या मजुरांकडून सुमारे १ लाख ५२ हजार रुपयांचे काम झाले असून उर्वरित १३ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी भीमराव घुगे यांच्या फिर्यादीवरून कल्याण बापूराव मुंडे याच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा युसूफवडगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अमजद सय्यद करीत आहेत.

Kaij Fraud Case
Latur Crime | जळकोट पोलिसांची अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध धडक कारवाई; दोन हायवा टिपरसह 50.50 लाखांचा मुद्देमाल जप्त!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news