
केज : चिंचोली माळी जवळ कार आणि ट्रॅक्टरच्या झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
सोमवारी (दि.११) नितीन शिंदे, त्यांचे सासरे लक्ष्मण व्यवहारे, त्यांची पत्नी, लहान मुलगी आणि त्यांचा मेव्हणा हे पाच जण चारचाकीमधून चौसाळा जि. बीड येथून केजकडे जात होते. सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास ते चिंचोली माळी जवळ आले असता कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने समोरून सोयाबीन घेवून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. अपघातात कारमध्ये बसलेले लक्ष्मण व्यवहारे वय (६५ वर्ष) यांचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. तर चालक नितीन शिंदे वय (४५ वर्ष) यांच्या छातीला व डोक्याला आणि मुक्कामार आहे. तसेच अपघातात नितीन शिंदे यांची ६ वर्षाची लहान मुलगी जखमी झाली असून तिचे समोरील दात पडले आहेत.
अपघातानंतर जखमींना रुग्णवाहिकेतून केज येथील सरकारी दवाखान्यात नेवून त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आहे. पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथे हलविण्यात आले आहे.