बीड : बसमध्ये चढत असताना चोरट्याने खिशातील ३० हजार हातोहात लांबविले

केज बसस्थानक परिसरातील घटना
Beed Crime News
बसमध्ये चढत असताना चोरट्याने खिशातील ३० हजार हातोहात लांबविले
Published on
Updated on

केज : पत्नीला घेवून औषधोपचारासाठी अंबाजोगाई येथे घेऊन जात असताना बसमध्ये पँटचा खिसा कापून ३० हजार रूपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. ही घटना बुधवारी (दि.१२) दुपारी ४:३० च्या सुमारास केज बसस्थानक परिसरात घडली.

याबाबतची माहिती अशी, अमोल चिंतामण डोंगरे (रा. सुर्डी थोट ता. जि. बीड) हे बुधवारी औषधोचारासाठी त्यांच्या पत्नीला अंबाजोगाई येथील दवाखान्यात घेवून जात होते. दुपारच्या सुमारास ते त्यांची पत्नी व एक नातेवाईक महिला हे केज बस स्थानकातून पुणे-अंबाजोगाई बसने जात होते. अमोल डोंगरे हे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांने त्यांच्या पँटचा खिसा कापून ३० हजार रुपये हातोहात लंपास केले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news