Fraud Case : मी नाशिकचा पंडित म्हणत हातचलाखीचा खेळ

खड्याचा रुद्राक्ष केला अन् अंगठी घेऊन पोबारा
beed crime news
Fraud Case : मी नाशिकचा पंडित म्हणत हातचलाखीचा खेळFile Photo
Published on
Updated on

The thieves, acting in collusion, stole a gold ring worth 24,000 rupees from a passenger

केज, पुढारी वृत्तसेवा : मी नाशिकचा पंडित आहे चमत्कार दाखवतो, असे सांगत दोन भामट्यांनी संगनमत करून एका प्रवाशाची २४ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार केज येथील बसस्थानकावर घडला आहे. हातचलाखीच्या माध्यमातून खड्याचा रुद्राक्ष करून दाखवत विश्वास संपादन करण्यात आला आणि संधी साधून अंगठी घेऊन दोघांनी पोबारा केल्याचे उघडकीस आले आहे.

beed crime news
६२७ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात झाले बंद

दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ८ वाजता, काशिदवाडी (ता. केज) येथील रहिवासी भिमा सोनाजी जाधव (वय ५७) हे पुण्याला जाण्यासाठी केज बसस्थानकावर उभे होते. यावेळी एक अन-ोळखी इसम त्यांच्याजवळ आला. थोड्याच वेळात दुसरा एक व्यक्ती तेथे आला व त्याने पहिल्या इसमाची ओळख करून देताना, हा नाशिकचा पंडित आहे, तो संकटे दूर करतो, असे सांगितले.

यानंतर दुसऱ्या इसमाने घरातील लग्न जमत नसल्याची बनावट समस्या सांगितली. त्यावर स्वतः ला पंडित म्हणविणाऱ्या व्यक्तीने चमत्कार दाखवतो, असे सांगून एका व्यक्तीच्या हातात खडा दिला. काही क्षणातच हातचलाखी करून त्या खड्याऐवजी रुद्राक्ष काढून दाखवण्यात आला, ज्यामुळे उपस्थितांचा विश्वास बसला.

beed crime news
Dharashiv Crime : तुळजापुरात पुन्हा बंदुकीचा धाक; हॉटेलसमोर गोळीबार, शहरात खळबळ

सीसीटीव्हीमध्ये कैद होण्याची शक्यता

केज बसस्थानक व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असल्याने अंगठी घेऊन पळून गेलेले हे दोन्ही भामटे कॅमेऱ्यात कैद झाले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून लवकरच आरोपींचा शोध लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, अशा चमत्कार, हातचलाखी व भोंदूपणाच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news