पुण्याच्या रांजणगाव येथील 'कोयता गँग' केज पोलिसांनी घेतली ताब्यात

हल्लेखोरांचा केला सिनेमा स्टाईलने पाठलाग
The 'Koyta Gang' was taken into custody
पुण्याच्या रांजणगाव येथील 'कोयता गँग' केज पोलिसांनी घेतली ताब्यातFile Photo
Published on
Updated on

गौतम बचुटे/केज

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता गँगने दहशत माजवण्याचा प्रयत्‍न केला. एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करून मोटार सायकलीवरून पळून जात असलेल्‍या कोयता गँगच्या सात हल्लेखोरांचा सिने स्टाईल पाठलाग करून केज पोलिसांनी मस्साजोग जवळ ताब्यात घेतले.

या बाबतची अधिक माहिती अशी की, परभणी जिह्यातील गंगाखेड मधील शिवाजी नगर येथील सौरभ श्रीराम राठोड हा (१७ वर्षीय) युवक शिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील कारेगाव ता. शिरूर येथे वास्तव्यास आहे. २३ मार्च रोजी रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास त्याचे मित्र यश धनवटे, आदित्य शिंदे, अक्षय युके, अवनिश प्रजापती हे हॉटेलमध्ये जेवण करून येत होते. त्यांना सौरभ राठोड याचे काही मुलांसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्या नंतर ओंकार देशमुख याचे साथीदार सौरभ राठोड यास म्हणाले की, तु ओंकार देशमुख यास खुन्नस देवुन का बघितलेस? तुला माहीत आहे का ओंकार देशमुख कोण आहे ? थांब तुला जिवंतच सोडत नाही असे म्हणत गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओंकार देशमुख, ओम चव्हाण, रोहन गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरूर) व दोन अनोळखी मित्रांनी कोयत्याने पोटात व पाठीवर वार करीत दगडाने डोक्यात मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी सोडविण्यास गेलेल्या यश राजू धनवटे यास हाताने व लाथा बुक्यांनी मारून दमदाटी केली. यामध्ये गंभीर जखमी सौरभ राठोड याच्यावर उपचार सुरू आहेत. यश धनवटे याच्या फिर्यादी वरून वरील सात जणांसह अनोळखी दोघांविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास करीत होते.

कोयता गँगला असे घेतले ताब्यात

रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी संपर्क साधताच पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश आघाव, पोलीस नाईक गोरख फड, पोलीस नाईक चंद्रकांत काळ कुटे, बाळासाहेब अहंकारे, प्रकाश मुंडे हे मस्साजोग येथील पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून दबा धरून बसले होते. सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना तीन मोटार सायकलवर ओंकार देशमुख आणि त्याचे साथीदार गिरीश कराळे, रोहन बोटे, शंकर करंजकर, ओम चव्हाण, रोहन गाडे आणि एकजण असे सातजण येत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करताच ते हल्लेखोर मोटार सायकली सोडून शेतात पळून जावू लागले. त्या नंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पुणे पोलीस घेणार ताब्यात

केज पोलीसानी सौरभ राठोड याच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या सात संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांना दिली असून आज रात्री त्यांचे पथक त्‍यांना ताब्यात घेण्यासाठी केजकडे रवाना झाले आहे. दरम्‍यान या आधीच कोयता गँगवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सौरभ राठाेडची प्रकृती नाजूक

ओंकार देशमुख आणि त्याच्या गँगने कोयत्याने हल्ला केलेल्या सौरभ राठोड याच्यावर शिरूर येथे उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांना मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news