Beed News : जिल्हाधिकारी यांनी घेतला माजलगावात जनता दरबार

महसूल, पाणीपुरवठा, शेती, रस्ते व विविध शासकीय योजनांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आल्या.
beed news
जिल्हाधिकारी यांनी घेतला माजलगावात जनता दरबारfile photo
Published on
Updated on

The District Collector held a 'Janata Darbar' in Majalgaon

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित जनता दरबारात शेकडो नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. महसूल, पाणीपुरवठा, शेती, रस्ते व विविध शासकीय योजनांशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर मांडण्यात आल्या.

beed news
सौर ऊर्जा प्रकल्प आणि वाळूमाफियांना अभय

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अश्विनी सोनवणे, उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले, तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी ज्योत्स्ना मुळीक तसेच पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

beed news
जालना जिल्हा बालकामगारमुक्त करण्यासाठी कामाची गती वाढवा : जिल्हाधिकारी मित्तल यांचे निर्देश

नागरिकांच्या समस्या सोडविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जनता दरबारादरम्यान शेतकरी युवा संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी थकीत ऊस बिलाच्या प्रश्नावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीसमोर आंदोलन केले. तालुक्यातील साखर कारखान्यांनी उसाचे बिल न दिल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news