बीड-नगर रस्त्यावर टँकरची दुचाकीला धडक: दोघे जागीच ठार

बीड-नगर रस्त्यावर टँकरची दुचाकीला धडक: दोघे जागीच ठार

आष्टी: पुढारी वृत्तसेवा : टँकरची दुचाकीला जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बीड-नगर महामार्गावरील डोईठाण येथील शिवनेरी चौकात आज (दि.२४) सायंकाळी चारच्या दरम्यान घडली. अनिल विठ्ठल तरटे (वय १९), महादेव गायकवाड अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाटोदा तालुक्यातील संकुडवाडी येथील महादेव गायकवाड कडा येथून काम आवरून धामणगाव मार्गे गावाकडे आज सायंकाळी जात होते. त्यांच्या दुचाकीवर अनिल तरटे हेही होते. दरम्यान, डोईठाण परिसरात शिवनेरी चौकात बीड येथून डिझेल खाली करून अहमदनगरच्या दिशेने टँकर (एमएच १६, सी.सी.७६३१) जात होता. यावेळी टँकरची महादेव यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पसार झालेल्या टँकर चालकाला कडा पोलिसांनी टँकरसह ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news