स्वाराती रुग्णालय परिसरात राडा: सुरक्षा रक्षकांकडून वकील व रिक्षाचालकास मारहाण

घटना नेमकी कशामुळे घडली याची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे खासदार सोनवणे यांचे निर्देश
crime news
crime newsPudhari
Published on
Updated on

अंबाजोगाई: येथील स्वामी रामानंद तीर्थ (स्वाराती) ग्रामीण शासकीय रुग्णालय परिसरात बुधवारी (दि.२५ ) सुरक्षा रक्षकांनी एका रिक्षाचालकासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष अ‍ॅड. इस्माईल गवळी यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, खासदार बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी जखमींची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

रुग्णालय परिसरात बुधवारी किरकोळ कारणावरून खासगी कंत्राटी सुरक्षा रक्षक आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले समाजसेवक अ‍ॅड. इस्माईल गवळी यांनाही सुरक्षा रक्षकांनी लक्ष्य केले. या मारहाणीत अ‍ॅड. गवळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. एका जबाबदार पदाधिकार्‍यावर झालेल्या या हल्ल्यामुळे रुग्णालय परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. "कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणी दिला?" असा संतप्त सवाल उपस्थित जनसमुदायाकडून विचारला जात होता.

प्रशासनाची मध्यस्थी

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे व उप-अधिष्ठाता डॉ. कचरे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी सुरक्षा रक्षकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांचे कडक निर्देश

घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे खासदार तथा रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी गुरुवारी रुग्णालयात जाऊन अ‍ॅड. गवळी यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले: सार्वजनिक रुग्णालयात अशा प्रकारे मारहाण होणे ही अत्यंत निंदनीय बाब आहे. ही घटना नेमकी कशामुळे आणि कोणामुळे घडली, याची मुळापर्यंत जाऊन चौकशी करा आणि दोषींवर तात्काळ कारवाई करा. येत्या काही दिवसांत अभ्यागत मंडळाची बैठक बोलावून रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि डॉक्टर यांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावला जाईल. भविष्यात 'स्वाराती' परिसरात अशा प्रकारच्या गुंडगिरीच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news