आंधळे यांच्या समर्थकांनी परळी शहर पोलिस ठाण्यासमोर ठेवत ठिय्या आंदोलन केले.Pudhari News Network
बीड
सरपंच हत्येप्रकरणी समर्थकांचा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या
हत्येप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी
परळी वैजनाथ : तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापूराव आंधळे यांची शनिवारी (दि.२९) गोळी झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी बबन गित्ते यांच्यासह त्यांच्या साथीदारांना अटक करावी, या मागणीसाठी आंधळे यांच्या समर्थकांनी मृतदेह परळी शहर पोलिस ठाण्यासमोर ठेवत ठिय्या आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
परळी शहर पोलीस ठाण्यात आंधळे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते.आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त भूमिका समर्थकांनी घेतली होती. आरोपीला अटक करण्याचे पोलीस प्रशासनाने आश्वासन दिल्यानंतर मृतदेह पोलीस ठण्यासमोरून हलवण्यात आला. त्यानंतर मृत सरपंच बापूराव आंधळे यांच्या पार्थिवावर मरळवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
