Kej Accident News | केज-कळंब महामार्गावर उसाची ट्रॉली पलटी, वीज खांब तुटून पडला

Kej Accident News | केज तालुक्यातील साळेगाव येथे 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Kej Accident News
Kej Accident News
Published on
Updated on

Kej Accident News

केज तालुक्यातील साळेगाव येथे 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने अचानक नियंत्रण सुटून विजेच्या खांबाला दिलेल्या धडकेत खांब तुटून रस्त्यावर कोसळला. अपघात एवढा गंभीर होता की विजेच्या तारा थेट जमिनीवर लोंबकळू लागल्या आणि त्यातून स्पार्किंग होत असल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

Kej Accident News
Beed News : ग्रामपंचायत कार्यालयात तोडफोड

सुमारे रात्री 12.30  हि घटना घडली होती. साळेगाव येथील विद्युत उपकेंद्राजवळून केज–कळंब महामार्ग क्र. 548 -सीवरून ऊस भरलेली ट्रॉली गंगामाऊली साखर कारखान्याकडे जात होती. त्यावेळी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडण्यासाठी वापरली जाणारी कनेक्टिंग पीन अचानक तुटली, आणि नियंत्रण सुटलेली ट्रॉली थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वीज वाहक खांबावर आदळली. धक्का इतका जोरदार होता की विजेचा खांब क्षणात तुटून रस्त्यावर कोसळला आणि ट्रॉली पलटी झाली.

अपघातानंतर पडलेल्या तारांमुळे काही क्षण परिसरात धोकादायक स्थिती निर्माण झाली. तारा एकमेकींना चिकटल्याने मोठ्या प्रमाणावर स्पार्किंग होत होती. सुदैवाची गोष्ट म्हणजे अपघाताच्या वेळी आसपास कोणीही नव्हते, तसेच ट्रॅक्टर चालकही सुरक्षित होता. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या अपघातामुळे साळेगावसह आसपासच्या गावांचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला.

Kej Accident News
डॉ. क्षीरसागरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

अपघाताची माहिती मिळताच उपकेंद्राचे ऑपरेटर साहिल पठाण हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपघाताबद्दल कळवले. पहाटेपासूनच वीज विभागाचे पथक खांब बदलण्याची आणि तारा दुरुस्त करण्याची तयारी करत आहे. मात्र खांब पूर्णपणे तुटलेला असल्यामुळे आणि तारा मोठ्या प्रमाणात खराब झाल्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी काही वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या अपघाताचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे उसाच्या हंगामात ट्रॅक्टर–ट्रॉलीची वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढते. अनेक वेळेस ट्रॉली ओव्हरलोड असतात किंवा जोडणी व्यवस्थित तपासली जात नाही. कनेक्टिंग पीन तुटणे किंवा ट्रॉलीचे नियंत्रण सुटणे अशा घटना ग्रामीण भागात अनेकदा घडतात. या प्रकारामुळे रस्त्यांवरील इतर वाहनांना, तसेच पायऱ्यांसाठीही धोका निर्माण होतो. त्यातच वीजखांबाला धडक बसल्यास मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा ठप्प होतो आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

Kej Accident News
Beed Crime | 'हातपाय बांधून गंगेत फेकून देऊ'; धमकी देऊन माजलगावात जळगावातील ३० ऊसतोड मजुरांना डांबले

साळेगावातील स्थानिक नागरिकांनी रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अडचणींचा सामना केला आहे. विशेषतः आजारी रुग्ण, शेतकरी व लहान मुलांसाठी ही परिस्थिती त्रासदायक ठरली. नागरिकांनी वीज विभागाकडे तातडीने दुरुस्तीची मागणी केली आहे.

दरम्यान, पोलिसांनीही घटनास्थळी पाहणी करून ट्रॅक्टर-ट्रॉलीची तपासणी केली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्याने पुढील कारवाई होणार आहे.

संपूर्ण परिस्थिती पाहता, उसाच्या वाहतुकीदरम्यान सुरक्षेची काळजी घेण्याची गरज पुन्हा एकदा समोर आली आहे. रस्ते सुरक्षेसोबतच वीजवाहिन्यांच्या संरक्षणासाठीही जागरूकता वाढवण्याची गरज वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news