बीड, पुढारी वृत्तसेवाः शहरातील नावाजलेल्या आदित्य शिक्षण संस्थेतील विद्यार्थी देश- विदेशात नावलौकिक मिळवत आहेत. नामवंत कंपनी, शासकीय सेवेतील मोठ- मोठ्या पदावर कार्यरत आहेत. नुकतीच आदित्य कृषी अभियांत्रिकी व जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी राहुल ईश्वर शिंदे याची परदेशात सिंचन अभियंता म्हणून निवड झाली.
बीड शहरातील आदित्य शिक्षण संस्था ही विद्यार्थ्यांना घडवणारी संस्था म्हणून नावारुपाला आलेली आहे. आदित्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थाना येथील प्राध्यापक, प्राचार्य यांचे मोलाचे मार्गदर्शन वेळो- वेळी मिळते.
यामुळे येथील विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या पदावर किंवा स्वातःचा चांगला उद्योग उभा करत आहेत. देशातील एकही अशी नामवंत कंपनी नाही, जिथे आदित्य शिक्षण संस्थेचे विद्यार्थी नाहीत. शासकीय सेवेतही मोठ मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पुन्हा एकदा आदित्यच्या राहुल ईश्वर शिंदे या विद्याथ्यनि परदेशात यश मिळवले आहे.
ओमान येथे सिंचन अभियंता म्हणून त्याची निवड झाली. या निवडीबद्दल आदित्य शिक्षण संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा, डॉ. आदिती सारडा यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
येथील आदित्य संस्थेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ. आदित्य सारडा साहेब, संचालिका डॉ. आदिती सारडा, प्राचार्य अमोल सानप, श्याम भुतडा यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. त्यांनीच मला मिळालेल्या संधीचे सोनं करण्याचा सल्ला दिला. आदित्य महाविद्यालयामुळेच परदेशात करिअरची संधी मिळाली.
राहुल शिंदे, सिंचन अभियंता, ओमान