केजजवळ भरधाव कारची ट्रकला धडक; २ ठार, ३ जण जखमी

अपघातातील मृत आंध्रप्रदेशातील
Car crash near the cage
बीड, केजजवळ कारने ट्रकला दिलेल्या धडकेत २ ठार झाले. Pudhari News Network
Published on
Updated on

केज: पुढारी वृत्तसेवा: कारने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तिघे जण जखमी झाले. मस्साजोग ते केज दरम्यान कोरेगाव फाट्याजवळ आज (दि.२६) पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. अपघातातील मृत आंध्रप्रदेशातील आहेत.

Car crash near the cage
बीड – २४ तासानंतर तलावात सापडला बुडालेल्या युवकाचा मृतदेह

Summary

  • कोरेगाव फाट्याजवळ भरधाव कारची ट्रकला धडक

  • अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर तिघे जण जखमी

  • अपघातातील मृत आंध्रप्रदेशातील

Car crash near the cage
बीड : भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला; शोधकार्य सुरु

या बाबतची माहिती अशी की, आज पहाटे बीड कडून अंबाजोगाईकडे येणारा ट्रक (एम एच-४४/ए बी-८७८६) कोरेगावच्या वळणावर थांबलेला होता. त्या वेळी ट्रक चालक हे त्यांच्या ट्रकची पाहणी करीत असताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने (ए पी-३९/एस एस-५६५७) उभ्या ट्रकला जोराची धडक दिली. यात कारमध्ये बसलेले आंध्रप्रदेशातील अनोळखी एक स्त्री व एक पुरुष यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या पाठीमागे बसलेले श्रुती संकुता, (रा. गुडीवाडा, आंध्रप्रदेश) आणि एक अनोळखी पुरुष हे दोघे जखमी झाले. तसेच ट्रक ड्रायव्हर रियाज तुराबखाँ पठाण (रा. पाटोदा, जि. बीड) हे जखमी झाले आहेत.

Car crash near the cage
बीड: गहुखेल येथे शेतात विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू

कारचा चक्काचूर झाला

हा अपघात एवढा भीषण होता की, कारचा चक्काचूर झाला. तर ट्रकचा मागील डाव्या बाजूचा टायर फुटला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. दोन मृत व एक जखमी यांची ओळख पटलेली नाही. तर दोघांची ओळख पटली आहे. पोलिसांनी आंध्र प्रदेशातील मृतांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. मृत व जखमी परराज्यातील असल्याने त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी भाषेची अडचण येत आहे. त्यांना तेलगू भाषे व्यतिरिक्त इतर भाषा समजत नाही.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलीस नाईक राजू गुंजाळ, शेख रशीद घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी जखमींना मदत केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news