Adhik Maas Tradition : अधिक महिन्‍यात लेकीच्या बापाची वाढली चिंता

सोशल मीडियामुळे जावयासाठी गरिब कुटुंबाची दमछाक
Adhik Maas Tradition
Adhik Maas Traditionpudhari photo
Published on
Updated on

गेवराई, गजानन चौकटे :

अधिक महिना आला की जावयाचा मानपान आला. जावयाला घरी बोलवायचं, जे जमेल ते प्रेमाने द्यायचं, जेवू घालायचं ही आपली परंपरा. पण गेल्या काही वर्षांत या परंपरेला सोशल मीडियाची नजर लागल्याचे चित्र दिसत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर जावयासाठी घेतलेल्या सोन्याच्या अंगठ्या, चांदीच्या वस्तू, महागडे कपडे आणि इतर भेटवस्तूंचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. स्पर्धेत सामान्य आणि गरीब कुटुंबांची दमछाक होत असल्याची चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे.

पूर्वी अधिक महिना देखील होता आणि जावयाचा मानही होता. पण तेव्हा घरात जे असेल ते प्रेमाने वाढले जायचे. चटणी-भाकरी असो की पुरणपोळी, त्यामागे आपुलकी होती. आता मात्र अनेक ठिकाणी प्रेमापेक्षा प्रदर्शन मोठे झाल्याची भावना व्यक्त होत आहे. एकीकडे दुष्काळ, शेतीचे प्रश्न, वाढती महागाई आणि कर्जाचे ओझे आहे. तर दुसरीकडे सोशल मीडियावर दिसणाऱ्या भपकेबाज पोस्ट पाहून काही कुटुंबांवर नकळत दबाव निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.

Adhik Maas Tradition
Goa Casino Controversy | कॅसिनो नावाचे राज्याच्या मुळावर उठलेले संकट

"लोक काय म्हणतील?" या विचारातून अनेक जण आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करत असल्याची खंतही व्यक्त केली जात आहे.परंपरा टिकल्या पाहिजेत, नाती जपली पाहिजेत; पण त्यासाठी सोशल मीडियावर प्रदर्शनाची गरज आहे का? हा प्रश्न आता अनेक लेकीच्या बापांच्या मनात निर्माण होत आहे.जावयाला मान द्या, पण लेकीच्या बापाची परिस्थितीही समजून घ्या; कारण नातं सोन्याने नाही तर माणुसकीने टिकते, अशा भावना व्‍यक्‍त होत आहेत.

Adhik Maas Tradition
Mumbai Water Crisis: महिन्याला 90 हजार भाडे, तरी पाण्यासाठी संघर्ष; मुंबईकरच्या VIDEOने उघड केले धक्कादायक वास्तव

अधिक महिना, जावयाचा मानपान आणि लेकीवरील प्रेम ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. मात्र अलीकडच्या काळात या परंपरेलाही सोशल मीडियाच्या दिखाव्याची किनार लागल्याचे दिसत आहे. जावयाचा सन्मान व्हायलाच हवा, पण तो करताना लेकीच्या बापाची आर्थिक परिस्थिती, त्याचे कष्ट आणि त्याच्या मर्यादांचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे. कारण प्रत्येक वडिलांकडे सोनं-चांदी नसतं, पण आपल्या लेकीसाठी जीवापाड प्रेम मात्र नक्की असते.

संतोष काळे

परंपरा जपणे ही काळाची गरज आहे, पण परंपरेच्या नावाखाली स्पर्धा निर्माण होणे योग्य नाही. सोशल मीडियावर दिसणारा थाट प्रत्येकाला परवडणारा नसतो. चटणी-भाकरी वाढणाऱ्या बापाचे प्रेम आणि सोन्याचे ताट वाढणाऱ्या बापाचे प्रेम यात फरक नसतो. फरक असतो तो फक्त परिस्थितीचा. त्यामुळे नात्यांना वस्तूंपेक्षा माणुसकीची जोड मिळाली तरच परंपरांचे खरे सौंदर्य टिकून राहील.

आश्विनी बारट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news