

Beed News |
धारूर : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही घटना 24 मे शुक्रवार रोजी मध्यरात्री घडली.
कोयाळ गावातील प्रदीप मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला व त्याने दोघांनाही दंश केला. दंशानंतर दोन्ही चिमुकल्यांची तब्येत अचानक बिघडली. तातडीने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली असून, मुंडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्पदंशामुळे बहीण-भावाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.