Santosh Deshmukh Murder Case | बीड जिल्ह्यात कडकडीत बंद, टायर जाळून निषेध

Beed Band | आरोपींना फाशीची शिक्षेची मागणी
Santosh Deshmukh Murder Case
बीडमध्ये आज टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. (Pudhari Photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. बीडच्या केज येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. बीड जिल्ह्यात रात्रीपासूनच संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, बीड जिल्हा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बीड शहरात व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त पद्धतीने दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदवला. तर सामाजिक संघटनांनी रस्त्यावरती उतरून बंदसाठी आवाहन केले. तसेच परळी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या सिरसाळा येथेही कडकडीत बंद पाळ‍ण्यात आला.

दरम्यान, वाल्मीक कराड याला फाशी देण्यात यावी अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. येथे मोठ्या संख्येने आंदोलनकर्ते उपस्थित होते, धनंजय मुंडे यांचे फोटो फाडून ते पायदळी तुडवण्यात आले.

Santosh Deshmukh Murder Case
सरपंच देशमुख हत्या प्रकरण : आरोपपत्रातील मारहाणीचे फोटो व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news