

गोविंद खरटमोल
अंबाजोगाई :- राज्यात काही वर्षांपूर्वी कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाकडून (राईट टू एजुकेशन) आरटीई ही योजना गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. मात्र ही योजना राज्यातील अनेक शाळांकडून म्हणावी तशी काटेकोरपणे राबवली नाही. अनेक शाळांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती योजना आपल्या शाळांपर्यंत येऊच दिली नाही. किंवा आलीच तर काही बोटावर मोजता येतील एवढ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या गेले. कालांतराने ही योजना ऑनलाइन पध्दतीने राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला .त्यामध्ये राज्यातील सर्व शाळा या आपल्या पोर्टल वर घेऊन त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरटीई योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसारच बीड जिल्ह्यात देखील ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या आरटीई योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. गुगल मॅपवर जिल्ह्यातील अंबाजोगाई शहर व तालुक्यातील नामांकित अशा तब्बल १८ शाळांचे ठिकाण व पत्ते (लोकेशन) चुकीचे दाखवण्यात आले आहेत. या संस्था एका ठिकाणी तर तिचे लोकेशन इतर ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे. यावरून बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग हा संस्थाचालकांचे हित जोपासन्याचा प्रयत्न तर करत नाही ना असा संतप्त सवाल येथील पालक उपस्थित करत आहेत.
अंबाजोगाई शहरातील सुजाण पालकांनी ही बाब येथील गटशिक्षण अधिकारी यांच्या निदर्शनास एका निवेदनाद्वारे आणून दिली. त्यावर येथील गटशिक्षणाधिकारी मधुकर सुवर्णकार यांनी बीड येथील शिक्षण अधिकारी यांच्या कडे पत्राद्वारे पाठवली. मात्र त्यानंतर तब्बल एक ते दीड महिन्यानंतर देखील बीड येथील शिक्षण विभागाने याकडे गंभीरपणे पाहिले नाही. एक ते दीड महिन्यांपूर्वी अंबाजोगाई परिसरातील त्या १८ शाळांचे लोकेशन दाखवण्यात आले होते तेच चुकीचे लोकेशन सोमवार दि २३ मार्च २०२६ रोजी देखील दाखवण्यात येत आहे.
त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या पालकांसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. महाराष्ट्र शासनाने तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बुधवार दि २५ मार्च २०२६ अशी घालून दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरताना ती शाळाच त्या पत्यावर (लोकेशनवर ) नाही तर अर्ज भरणारच कसा असा सवाल येथील पालक उपस्थित करत आहेत. यावरूनच खाजगी संस्था व बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग यांचे काही लागेबांधे तर नाहीत ना ?, शहरातील विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत शिक्षण योजनेचा फायदा मिळू द्यायचा तर नाही ना असे एक ना अनेक सवाल येथील पालक उपस्थित करत आहेत.
याबाबत आमच्या प्रतिनिधीनी अंबाजोगाई शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता मिटिंग चालू असल्याचे सांगितले तर बीड शिक्षण अधिकारी किरण कुंवर यांच्याशी संपर्क साधला तर त्यांनी फोनच रिसिव्ह केला नाह