Beed News : तरनळी येथे वस्तीशाळेचे छत कोसळले

रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला; प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप, कठोर कारवाईची मागणी
Beed News
Beed News : तरनळी येथे वस्तीशाळेचे छत कोसळलेfile photo
Published on
Updated on

Roof of school collapses at Taranali

केज, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील तरनळी वस्तीवरील षटकोनी आकाराच्या शाळेचे छत कोसळून शाळा जमीनदोस्त झाली आहे. सुदैवाने हा प्रकार रात्री घडल्याने अनर्थ टळला. याच धोकेदायक इमारतीत विद्यार्थी शिक्षण घेत होते. या प्रकारामुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाविरुद्ध तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Beed News
Manoj Jarange protest: 'ईडीची पीडा मागे लागण्याच्या भीतीपोटी जरांगेंनी आंदोलन मागे घेतले'; मराठा आरक्षण अभ्यासकाचा आरोप

दि. 18 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या हलक्या पावसाने केज तालुक्यातील लव्हरी केंद्रातील घटक शाळा असलेल्या तरनळी येथील तांदळे वस्तीवरच्या एका असलेली षटकोनी आकारातील शाळेची इमारत अगदी पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली आहे. त्यात ही शाळा जमीनदोस्त झाली आहे. मात्र हा प्रकार मध्यरात्री शाळा बंद असताना घडल्याने सुदैवाने अनर्थ टळला आहे.

मात्र याच धोकेदायक असलेल्या इमारतीत तांदळे वस्तीवरील सुमारे 18 चिमुकले विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत होते. ग्रामस्थानी या धोकेदायक असलेल्या, अगदी हलक्या व रिमझिम पावसात शाळेच्या छतातून पाणी ठिबकत असल्याने शाळा धोकेदायक असल्याची माहिती शिक्षण विभागासह पंचायत समिती आणि महसूल विभागाला देखील कळविली असल्याची माहिती वस्तीवरील रहिवाशी असलेले चांगदेव सानप यांनी दिली आहे.

मात्र निर्धावलेल्या प्रशासन काय ही शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अंगावर ढासळून मोठी दुर्घटना किंवा जीवित हानी होण्याची वाट पाहत होते की काय? अशी संतप्त प्रतिक्रिया पालक आणि नागरिकांतून उमटत आहेत.

Beed News
Beed News : चेष्टा-मस्करीतही आक्षेपार्ह मजकूर शेअर करू नका
या वस्ती शाळेच्या इमारतीचे छत पावसाने गळत असून पाणी ठिबकत असल्याची तक्रार ग्रामस्थ यांनी केली असल्याने आम्ही त्याची माहिती वरिष्ठांना दिली होती.
- सुनील केंद्रे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news