गौतम बचुटे, केज : केज येथे एका १३ वर्षीय मुलीचा शाळेत जाता-येता तिचा पाठलाग करून विनयभंग करीत मुलीच्या नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवारी (दि.30) घडली.
या बाबत अधिक माहिती अशी, केज शहरातील १३ वर्षीय मुलगी शाळेत जात असताना विकास सुभाष सिरसट (रा. धारूर रोड, केज) हा मागील दोन महिन्यांपासून तिला वाईट हेतूने थांबवून तिचा पाठलाग करीत होता. त्याने तिचा विनयभंग केला. उलट विकास सिरसट, त्याचे वडील सुभाष सिरसट, त्याची आई, औटी नावाचे त्याचे मामा, मामी या पाच जणांनी मुलीच्या नातेवाईकांना ३० सप्टेंबर रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास घडली. पीडित मुलीच्या तक्रारी वरून विकास सिरसटसह त्याचे आई, वडील, मामा, मामी या पाच जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.