Beed News : आमचा महसूल चालतो मग आम्हाला रस्ता का नाही ?

माजलगाव : आझाद क्रांती सेनेचा सरकाला सवाल
Beed News
Beed News : आमचा महसूल चालतो मग आम्हाला रस्ता का नाही ?File Photo
Published on
Updated on

Rasta Roko protest at Jaykochiwadi Phata near Khamgaon Pandharpur highway

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा :

खामगाव पंढरपूर महामार्गाजवळ जायकोचीवाडी फाटा येथे दि. २१ जून २५ रोजी सकाळी १० वाजता आझाद क्रांती सेनेच्या वतिने न्याय मागण्या साठी भव्य रस्तारोको करण्यात आला.

Beed News
Beed Crime News : ३ लाख ९४ हजारांची गांजाची झाडे जप्त !

आम्हाला प्यायला स्वच्छ पाणी का नाही ? आमच्या गावच्या शाळेला दर्जेदार शिक्षण का नाही ? शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही. गेली ३५ वर्षापासून जायकोचीवाडीचा रस्ता अद्यापपर्यंत झालेला नाही शाळेतील विद्यार्थी, अबलावृद्ध, गर्भवती महिला, यांच्यासह गावकऱ्यांना दळणवळणा साठी रस्ता नसल्यामूळे नागरिकांमध्ये चिड निर्मान झाली असून रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Beed News
Warkari Farmer Death | रान डुक्करांच्या हल्ल्यात वारकरी शेतकऱ्याचा मृत्यू

रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन आझाद क्रांती सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा याप्रसंगी देण्यात आला या आंदोलनामध्ये आझाद क्रांती सेना प्रमूख राजेशजी घोडे, ता. प्रमूख अशोक ढगे, किसन भिसे, उद्धव हतागळे, राहूल हिवाळे, अरूण वाकणकर, अकाश गायकवाड, संजय पिसूळे, भारत गायकवाड, गणेश कांबळे, पांडुरंग कांबळे, अशोक गायकवाड ( मन्या), सुनील कांबळे, सुनील खंडागळे, सुरेश घोडे, बप्पा सुरवसे, दादाराव थोरात, व समस्त गावकरी महिला यांची लक्षणीय उपस्थीती होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news