Beed Crime News : केमिकलपासून सिंथेटिक ताडी तयार करणारे रॅकेट उघड

गेवराई पोलिसांची संजयनगर भागात कारवाई : पाचजण ताब्यात
Crime News
Beed Crime News : केमिकलपासून सिंथेटिक ताडी तयार करणारे रॅकेट उघडFile Photo
Published on
Updated on

Racket producing synthetic tadi from chemicals busted

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : शहरातील संजय नगर परिसरात केमिकलच्या साहाय्याने सिंथेटिक ताडी (सिंधी दारू) तयार करून तिची विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या कारवाईत ५० लिटरपेक्षा अधिक रसायनयुक्त दारू तसेच चार केमिकलच्या बॅगा जप्त करण्यात आल्या असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Crime News
Illegal Sand Seized : अवैध वाळूच्या दोन टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संजय नगर भागात गेल्या काही दिवसांपासून रसायनापासून ताडीसदृश दारू तयार करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेएक ते दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.

या कारवाईदरम्यान ५० लिटरपेक्षा अधिक रसायनयुक्त दारू जप्त करण्यात आली. तसेच प्रत्येकी १४० ग्रॅम वजनाच्या चार केमिकलच्या बॅगा, असे एकूण ५६० ग्रॅम रसायनही पोलिसांनी हस्तगत केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी दारू तयार करणाऱ्या मुख्य आरोपीसह अन्य चार जणांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे.

Crime News
Beed Crime News : कोयत्याने वार करून जबरी चोरी करणारी टोळी पकडली

ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलिस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कटके व पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि पवार, सपोनि लांडगे, पोउनि राम खोत, राठोड, पोटे, खांडेकर, सरवदे आर्दीच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news