

केज : केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी ( दि. ११) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथून ताब्यात घेतले. त्याला केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आज (दि. १२) हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ डिसेंबरपर्यंत सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अद्याप या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू चाटे यांच्यासह इतर दोन असे एकूण चार आरोपी अद्यापही फरार आहेत.