Beed Crime News : वडापाव सेंटरमधील मटका बुकीवर पोलिसांची धाड

रोख १७ हजार रुपयांसह मोबाईल आणि साहित्य जप्त
beed crime news
Beed Crime News : वडापाव सेंटरमधील मटका बुकीवर पोलिसांची धाडFile Photo
Published on
Updated on

Police raid Matka bookie in Vadapav Center

गौतम बचुटे/केज:- केज येथील एका वडापाव सेंटरमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाने धाड टाकून १७ हजार रु. रोख आणि दोन मोबाईलसह मटक्याचे साहित्य असे एकूण ५७ हजार रु. चा मुद्देमाल जप्त करून दोघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

beed crime news
Beed News : केजमध्ये मटका बुक्यांवर छापे; २४ हजाराचा मुद्देमाल जप्त

केज येथील जुन्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोर असलेल्या गणेश वडापाव सेंटरमध्ये मटका बुकी सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांना एका गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली होती. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम यांनी त्यांचे पथकातील पोलिस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर यांना कारवाईचे आदेश दिले.

आदेश मिळताच पोलिस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर, पोलिस हवालदार राजू गुंजाळ, पोलिस हवालदार बालासाहेब डापकर यांनी दि. २२ एप्रिल रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास गणेश वडापाव सेंटरवर छापा टाकला. त्यावेळी लहु लक्ष्मण गिरी हा तेथे त्याचे फायद्यासाठी १० टक्के कमिशनवर मटका बुकी मालक इस्माईल इनामदार यांची मटका बुकी चालवित असल्याचे आढळून आले.

beed crime news
Beed Crime News | अंबाजोगाईत हॉटेलवर पोलिसांचा छापा; 'तिर्रट' जुगाराचा डाव उधळला, ६ जणांना अटक

पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे रोख १७ हजार ८०० रु. आणि दोन मोबाईल व मटक्याचे साहित्य असा एकूण ५७ हजार ८०० रु. चे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोलीस हवालदार बालासाहेब डापकर यांच्या तक्रारी वरून लहू गिरी आणि मटका बुकी मालक इस्माईल इनामदार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस जमादार विष्णू नागरगोजे हे तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news