

Kej police action
गौतम बचुटे
केज : केज शहरालगत एका घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड टाकून स्वतःच्या घरात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्याला ताब्यात घेत पीडितेची सुटका करण्यात आली .
या बाबतच्या अशी की, केज येथील भवानी माळ येथे मारुती भिवाजी चाटे, (रा. तांबवा, ता. केज) हा त्याचे राहते घरी वेश्या व्यवसाय चालवित होता. ही माहिती गुप्त खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहिती वरून केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या आदेशा वरून अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले.
पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी एक डमी ग्राहक व पोलीस पथकास योग्य त्या सुचना देऊन स्वतः पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, पोलिस हेडकॉन्स्टेबल बाळासाहेब अहंकारे, महिला पोलिस हवालदार दगडखैर, पोलिस हवालदार प्रदिप येवले, पोलिस हवालदार अशोक शिंदे आणि योगेश निर्धार हे पंचासह दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ च्या सुमारास भवानीनगर धारुर रोड केज येथे थांबवून सापळा रचला.
डमी ग्राहकास मारुती भिवाजी चाटे यांच्या घरात प्रवेश केला. काही वेळाने डमी ग्राहकाने थुंकण्याच्या बहाण्याने बाहेर येवून इशारा केला. इशारा पाहून पोलिसांनी छापा मारला आणि घरात कुंटणखाना चालविणारा मारुती चाटे याला ताब्यात घेत धाराशिव जिल्ह्यातील युसुफवडगाव (ता. केज) येथील एका ३७ वर्षीय महिलेची सुटका केली. झडतीत डमी ग्राहकाकडे पोलिसांनी दिलेल्या नोटा आणि इतर साहित्य जप्त केले. पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांच्या फिर्यादी वरून मारुती चाटे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे करीत आहेत.