Beed Cattle Smuggling : गोवंशाची अवैध वाहतूक करणारा पिकअप पकडला; ६ जनावरांची सुटका

केज-अंबाजोगाई रस्त्यावर पोलिसांची कारवाई
Cattle Smuggling
Cattle SmugglingPudhari File Photo
Published on: 
Updated on: 

केज : गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणारा पिकअप पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतला. या कारवाईत साडे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरूवारी (दि.२९) सकाळी ९ च्या सुमारास केज-अंबाजोगाई रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालया समोर करण्यात आली.

पिकअप (क्र. MH-55/C-0232) मधून काही गोवंशीय जनावरांची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती केज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केज-अंबाजोगाई रस्त्यावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर सापळा लावून गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारा पिकअप ताब्यात घेतला. वाहनाची झडती घेतली असता, त्यामध्ये ३ बैल, १ गाय आणि २ कालवड अशी एकूण ६ गोवंशीय जनावरे आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत पिकअपसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रकाश मुंडे यांच्या फिर्यादीवरून गुरांचा मालक सलमान महेबुब शेख (रा. वाढवणा ता. उदगीर जि. लातुर) व पिकअप चालक रमेश बापुराव चव्हाण (रा. डोंगर कोन्हाळी ता. जळकोट जि. लातुर) या दोघां विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिला पोलिस हेडकॉस्टेबल संगीता हनवते या पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.