

बीड : पुढारी वृत्तसेवा
केज-कळंब रोडवर चिंचोली पाटीजवळ प्रताप गुंड आणि युवराज काळे यांच्या शेताजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिक-अप पलटी झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला.
सदर पिकअपवरचा चालकाचा ताबा सुटून रस्त्याच्या खाली जात असताना समोरून एक भरधाव जीप येत होती. अचानक समोर पिकअप आडवे आल्याने त्याला चुकविण्याच्या नादात पिकअपचा मोठा अपघात घडण्याची शक्यता होती, मात्र जीप चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला.