मातोरी येथे दगडफेकीनंतर तणाव निवळला

पोलीस प्रशासनाचा मोठा बंदोबस्त
A tense atmosphere has arisen in Matori after stone pelting.
मातोरी येथे दगडफेकीनंतर तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे.Pudhari Photo
Published on
Updated on

शिरूर : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सध्या अभिवादन दौऱ्यावर आहेत. दरम्यान गुरुवारी (दि. 27) रोजी हा अभिवादन दौरा मनोज जरांगे यांच्या गावातून जात होता. तेव्हा मातोरी गावात दगडफेक झाली. यात सात ते आठ जण जखमी, तर पाच ते सात मोटारसायकलींचे नुकसान झाले आहे. या दरम्यान दोन्ही समाजाच्या लोकांमध्ये बाचाबाची आणि दंगल सदृश्य वातावरण निर्माण झाले होते.

मातोरी गावासह शेजारील परिसरामध्ये रात्री 7:30 पासून दोन्ही गटातील लोकांकडून तणावाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. गाड्यांची तोडफोड आणि अंधारामध्ये झालेली दगडफेक यामुळे मातोरी गावामध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. सदरील घटनेची माहिती चकलांबा पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.

A tense atmosphere has arisen in Matori after stone pelting.
जरांगे यांच्या मातोरी गावात परिस्‍थिती नियंत्रणात; गावात शांतता

प्रसंगाचे गांभीर्य पाहून बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही मातोरी गावांमध्ये तळ ठोकला होता. तर गुरुवारी मध्यरात्री संभाजीनगर पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पोलीस प्रशासनाला खडा बंदोबस्त देण्याचे आवाहन केले. तर लक्ष्मण हाके यांचा अभिवादन दौरा भगवान गडाकडे रात्री खूप उशीर झाल्याने हाके व वाघमारे यांच्या सत्कारासाठी शिरूर तालुक्यातील फुलसांगवी फाटा, शिंगारवाडी फाटा, तिंतरवणी, बोरगाव फाटा, घोगस पारगाव, ओबीसी बांधवांनी गर्दी केली होती. शुक्रवारी (दि.28) सकाळ पासूनच पोलीस प्रशासनाची दोन पथके मातोरीमध्ये तैनात होती. सदरील घटनेची सोशल मीडिया मार्फत माहिती मिळाल्याने प्रसार माध्यमासाठी चर्चेचा विषय बनल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्त आणि प्रसार माध्यमांची वर्दळ सुरु होती. यामुळे मातोरी गावाला सकाळी छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसाच्या बंदोबस्तामुळे सद्यस्थितीमध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तिंतरवणी कडकडीत बंद

मातोरी गावामध्ये झालेल्या दगडफेकीचा निषेध म्हणून तालुक्यातील तिंतरवणी हे गाव ओबीसी समाजाकडून शुक्रवारी (दि.28) कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.

आमदार सुरेश धस यांच्याकडून शांततेचे आवाहन

मातोरी गावातील घटनेमुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा मतदार भाजपा नेते तथा विधान परिषद सदस्य सुरेश धस यांनी मातोरी ग्रामस्थांना भेट देऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news