Beed Parli thermal power station women protest| परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्राबाहेर महिलांचे आंदोलन

Beed | राख विक्रीच्या आदेशांची अंमलबजावणी रखडल्याचा आरोप; जातीय भेदभावाच्या चौकशीची मागणी
Beed Parli thermal power station women protest
Beed Parli thermal power station women protest
Published on: 
Updated on: 

परळी वैजनाथ : परळी वैजनाथ औष्णिक विद्युत केंद्रातील राख विक्रीच्या आदेशांची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ मागासवर्गीय महिलांनी आंदोलन केले. मंगळवारी (दि. २७) मुख्य अभियंता कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस व प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून आंदोलन रोखले.

महाजनकोच्या परळी औष्णिक विद्युत केंद्रामार्फत महिलांच्या नावे राख विक्रीचे सेल ऑर्डर क्रमांक ०५२११ व ०५२१२ आणि संबंधित परवानगी आदेश ९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आले होते. मात्र, आदेशांना मंजुरी मिळूनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने आर्थिक नुकसान व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांनी निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणात जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात आहे. जातीय भेदभावाची शक्यता असल्याचा आरोप करत महिलांनी वरिष्ठ स्तरावरून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आदेशांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांची कारणे लेखी स्वरूपात द्यावीत, दोषींवर कारवाई करावी आणि संबंधित आदेश तातडीने कार्यान्वित करावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Beed Parli thermal power station women protest
Graduate Constituency Election : पदवीधर निवडणुकीत बीड जिल्ह्यात ५९.६७ टक्के मतदान

यापूर्वी आंदोलन व उपोषणाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्यानंतर महिलांनी आत्मदहनाची अंतिम पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार आंदोलनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य अनर्थ टळला. आता या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते आणि राख विक्रीचे आदेश प्रत्यक्षात कधी कार्यान्वित होतात, याकडे लक्ष लागले आहे. संबंधित आरोपांबाबत औष्णिक विद्युत केंद्राची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध झालेली नाही.

Beed Parli thermal power station women protest
Beed News : बीड जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्तीची चौथी यादी जाहीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news