

परळी वैजनाथ : परळी शहरात विनयभंगाच्या प्रकरणांचा सिलसिलाच सुरू झाला असून सध्या चर्चेत असलेल्या डॉक्टरने केलेल्या विनयभंगाच्या प्रकारानंतर आणखी एक खळबळजनक असा विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. आपल्या नातीच्या वयाच्या असलेल्या एका नऊ वर्षाच्या चिमुरडीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, परळीतील गंगासागर नगरमध्ये संबधित आरोपी राहतो. त्याच्या घरी फिर्यादीची ९ वर्षाची नात घरी खेळण्याकरीता गेली असता हा विनयभंगाचा प्रकार घडला. आरोपी लखन घनघाव वय 35 वर्ष रा. गंगासागर नगर परळी याने घरी खेळण्यासाठी आलेल्या चिमुरडीशी अश्लील चाळे केले. तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. याप्रकरणी पिडीतेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो ॲक्ट 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जाधवर पिंक पथक अंबाजोगाई हे करीत आहेत.