Parli Professor Patent | परळीतील संशोधकाच्या ‘स्मार्ट शेती’ उपकरणाला केंद्राची मान्यता

प्रा. डॉ. गिरीश चाटे यांच्या मृदा प्रतिमा ओळख व पीक शिफारस उपकरणाच्या डिझाइनला भारत सरकारचे पेटंट
Girish  Chate Smart Farming Device Patent
Girish Chate Smart Farming Device PatentPudhari
Published on
Updated on

Girish Chate Smart Farming Device Patent

परळी वैजनाथ : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने परळीतील संशोधक प्रा. डॉ. गिरीश दशरथ चाटे यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या ‘डीप लर्निंग-बेस्ड सॉईल इमेज रिकग्निशन अँड क्रॉप रिकमेंडेशन डिव्हाइस’ या उपकरणाच्या डिझाइनला भारत सरकारच्या पेटंट, डिझाइन आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडून मान्यता मिळाली आहे. या डिझाइनची नोंदणी गिरीश दशरथ चाटे यांच्या नावावर करण्यात आली असून, त्यांना अधिकृत पेटंट प्रमाणपत्रही जारी करण्यात आले आहे.

भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत पेटंट कार्यालयाने त्यांच्या या संशोधनात्मक उपकरणाच्या डिझाइनला नुकतीच मान्यता दिली. उपकरणाच्या नावावरून त्याची संकल्पना स्पष्ट होते. डीप लर्निंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मातीच्या प्रतिमांचे विश्लेषण करून त्याआधारे योग्य पिकांची शिफारस करण्याची या उपकरणाची संकल्पना आहे.

Girish  Chate Smart Farming Device Patent
Parli Ganesh Visarjan | अवर्षणाची परिस्थिती: यंदा परळीतील गणरायांचे चांदापूर तलावात विसर्जन; पारंपरिक ठिकाण बदलण्याची वेळ

शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप लर्निंग आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना मातीचे विश्लेषण आणि पीक निवडीसाठी तंत्रज्ञानाधारित प्रणाली विकसित करण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर चाटे यांच्या उपकरणाच्या डिझाइनला मिळालेले पेटंट हे संशोधन आणि नवकल्पनेच्या दृष्टीने उल्लेखनीय मानले जात आहे.

मातीच्या प्रतिमांची ओळख करून तिच्या आधारे पीक निवडीसाठी शिफारस करण्याच्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. स्मार्ट शेतीच्या दिशेने तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी या संशोधनामुळे नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Girish  Chate Smart Farming Device Patent
Beed Illegal cattle transport in Parli| परळीत गोवंशाची निर्दयी वाहतूक; पाच जनावरे व पिकअपसह १३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

परळी वैजनाथ तालुक्यातील मांडवा येथील रहिवासी असलेल्या प्रा. डॉ. गिरीश दशरथ चाटे यांनी हे संशोधनात्मक उपकरण डिझाइन विकसित केले आहे. त्यांच्या या संशोधनाची केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत नोंदणी झाल्याने त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गिरीश चाटे यांना विद्याक्षेत्रातील मानाची समजली जाणारी पीएचडी पदवीही प्रदान करण्यात आली आहे. संशोधन क्षेत्रातील त्यांच्या या दुहेरी यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news