परळी गर्भवती महिला हेळसांड प्रकरण : जिल्हा शल्यचिकित्सकांकडून गंभीर दखल; चौकशीसाठी तज्ञ वैद्यकीय समिती नियुक्त

चौकशी अहवाल येताच होणार कठोर कारवाई
Parli Pregnant Woman Negligence Case
परळी गर्भवती महिला हेळसांड प्रकरण : जिल्हा शल्यचिकित्सकांकडून गंभीर दखल; चौकशीसाठी तज्ञ वैद्यकीय समिती नियुक्तfile photo
Published on
Updated on

Parli Pregnant Woman Negligence Case: District Civil Surgeon Takes Serious Cognizance

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा

परळी शहरातील गित्ते हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात गर्भवती महिलेच्या उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या गंभीर प्रकरणाची जिल्हा शल्य चिकित्सकांनी तातडीने दखल घेतली आहे. या प्रकरणी प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सक बीड डॉ. सतिशकुमार साळुंके यांनी हा प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Parli Pregnant Woman Negligence Case
Sathankulam Custodial Deaths | वर्दीतील क्रौर्याला वेसण!

तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी डॉ. कल्पना सचिन गित्ते या डॉक्टरांवर उपचारात निष्काळजीपणा, वेळेवर योग्य वैद्यकीय निर्णय न घेणे, मृत भ्रूण तब्बल २२ तास मातेच्या पोटात ठेवणे तसेच आर्थिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्यचिकित्सका डॉ. सतिशकुमार साळुंके यांनी तातडीने चार सदस्यीय वैद्यकीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. संबंधित रुग्णालयातील उपचार प्रक्रिया, वैद्यकीय नोंदी, डॉक्टरांची भूमिका, उपचारातील विलंब तसेच रुग्णाच्या प्रकृतीशी संबंधित सर्व बाबींची सखोल तपासणी समितीकडून केली जाणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतिशकुमार साळुंके यांनी स्पष्ट केले आहे की, हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. या प्रकरणी अतिशय गांभीर्यपूर्वक व वस्तुनिष्ठ चौकशी तातडीने करण्यात येईल. चौकशी अहवाल प्राप्त होताच दोषी आढळणाऱ्यां विरोधात नियमानुसार कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रुग्णांच्या जीवाशी कोणत्याही परिस्थितीत खेळ सहन केला जाणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Parli Pregnant Woman Negligence Case
Beed Parli News: वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना; डॉक्टरांनी २२ तास मृत बाळ मातेच्या पोटातच ठेवले!

दरम्यान, या घटनेमुळे परळी शहरासह परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित कुटुंबाला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. पोलीस प्रशासनाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news