

नेकनुर : मागच्या अनेक वर्षांपासून नेकनुरच्या मुख्यरस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना दोन दिवसांपूर्वी शुक्रवारपर्यंत रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या काहीनी ऐकले तर काही काहीजण थांबले मात्र शुक्रवार दुपारी पोलीस बंदोबस्तात जेसीबी अतिक्रमणावर चालू लागल्याने धावपळ उडाली.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढल्याने वाहतुकीला अडथळा ठरत होता. शिवाय यामुळे नेहमीच वादावादी होत असल्याने नेकनुरचे अतिक्रमण कळीचा मुद्दा बनला होता यातच राज्यभर न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाल्याने केज पाठोपाठ नेकनुर मोहीम राबविण्यात येणार असल्याच्या सूचना स्पीकरद्वारे बुधवारी देण्यात आल्या.
यामध्ये शुक्रवारी नेकनुरमध्ये अतिक्रमण हटवण्यासाठी यंत्रणा पोलिस बंदोबत घेऊन दुपारी दाखल झाली अगोदर सूचना असल्याने अनेकांनी गुरवारी अतिक्रमण काढून घेण्यास सुरूवात केली. काहीजण थांबले त्यांना अखेर मोठा फटका बसला मोजमाप करत जेसीबी अतिक्रमणावर चालू लागल्याने यामध्ये नुकसान झाले. हे बघून उर्वरित लोकांनी आपआपले अतिक्रमण काढून घेण्यास सुरूवात केल्याने मोठी धावपळ पाहायला मिळाली भर उन्हात यंत्रणा रस्त्यावर उतरली यामध्ये बांधकाम विभागाचे कर्मचारी, नेकनुरचे सपोनी चंद्रकात गोसावी, उपनिरीक्षक रोकडे, ओताडे, पोलिस कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.