

NCP announces candidates for Dharur Municipality
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा राजकीय निर्णय घेत नगराध्यक्ष तसेच सर्व दहा प्रभागांतील नगरसेवक पदांचे उमेदवार जाहीर केले आहेत. शुक्रवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत आ. प्रकाश सोळंके यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली. निवडणुकीस काहीच दिवस शिल्लक असताना पक्षाने जाहीर केलेल्या यादीमुळे राष्ट्रवादीची तयारी इतर पक्षांपेक्षा अधिक प्रभावी ठरत असल्याचे स्पष्ट झाले.
नगराध्यक्ष पदासाठी बालासाहेब रामराव जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्याचबरोबर दहा प्रभागांतील एकूण २० नगरसेवक उमेदवारांची अंतिम यादी देखील घोषित करण्यात आली. महिला, मागासवर्ग, अनुसूचित जाती तसेच सर्वसाधारण प्रवर्ग यांना संतुलित प्रतिनिधित्व देत पक्षाने समतोल पॅनेल तयार केल्याचे दिसून आले.
प्रभागनिहाय उमेदवारांची यादी प्रभाग १ : सुनिता चव्हाण (महिला सर्वसाधारण), शेख गफार ( ारण), प्रभाग २ सौ. उषा गावसमुद्रे (एससी महिला), नितीन शिनगारे (सर्वसाधारण), प्रभाग ३ः ज्योती गायसमुद्रे (एससी महिला), सुरज कोमटवार (सर्वसाधारण), प्रभाग ४: डॉ. आकांक्षा फावडे (मागासवर्ग महिला), शांताबाई कावळे (सर्वसाध मागासवर्ग), शेख हुमा गयासोद्दीन (महिला सर्वसाधारण), प्रभाग ६ बानुबेगम सय्यद (महिला सर्वसाध सर्वसाधारण), सय्यद हारुण (सर्वसाधारण) प्रभाग ७ आवेज कुरेशी (मागासवर्ग), संगीता भावठाणकर (महिला सर्वसाधारण), प्रभाग ८ सुप्रिया जाधव (मागासवर्ग महिला), गणेश सावंत (सर्वसाधारण), प्रभाग ९ अश्विनी गायके (मागासवर्ग महिला) सुधीर शिनगारे (सर्वसाधारण), प्रभाग १० लक्ष्मण सिरसट (एससी), सौ. भूमिका वैरागे (महिला सर्वसाधारण).
पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सोळंके म्हणाले, इच्छुकांना वेटिंगवर ठेवणे किंवा संभ्रमात ठेवणे योग्य नाही. सर्वांना विश्वासात घेऊन वेळेआधीच उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ मजबूत आणि एकसंध ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. तसेच, नगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर धारूर शहराचा सर्वांगीण विकास प्राधान्याने करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. स्वच्छ पाणीपुरवठा, शहर स्वच्छता, तसेच किल्ल्याच्या डागडूजीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्याच्या योजना त्यांनी मांडल्या. मागील काही कालावधीत विकासकामे ठप्प झाल्याची टीका करत, आगामी पाच वर्षांत धारूरला नवे रूप देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला