

बीड, पुढारी वृत्तसेवा
संतोष देशमुख हत्याप्रकरणात तपासात कुचराई केल्याच्या ठपका ठेवत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. यानंतर बीडमध्ये आज नव्या एसपींची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनीत कावत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक राहणार असून, ते यापूर्वी पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी कार्यरत होते. आता बीड मधील कायदा सुव्यवस्था सुरळीत करण्याचे आवाहन कावत यांच्यासमोर असणार आहे.