

केज : राष्ट्रीय महामार्ग म्हणून गोंडस नाव असले तरी मात्र जागोजागी सिमेंट रस्त्याला पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यातील बाहेर निघालेल्या लोखंडी सळ्या; यामुळे आता हा राष्ट्रीय महामार्ग नव्हे तर प्रवाशांच्या मृत्यूचे सापळे झाले आहेत.
खामगाव-सांगोला या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-सी हा राष्ट्रीय महामार्गाला माजलगाव ते केज दरम्यान पडलेल्या भेगा आणि खचल्याने त्याची चर्चा आहे. त्यावर अनेकांना जीव गमवावा लागला आहे; आणि अनेकजण जायबंदी झाले आहेत. तसेच हा रस्ता केज ते कळंब दरम्यान साळेगाव, सुर्डी फाटा आणि मांगवडगाव फाटा तसेच मांजरा पूल येथे खराब झालेला आहे. अनेक ठिकाणी पुलावर खड्डे पडलेले आहेत.
आधीच पुलावरचे रस्ते हे जम्पिंगचे असून त्यावरचे सिमेंट उखडून पडलेल्या खड्ड्यांमुळे त्याच्या उघड्या पडलेल्या आहेत. या उघड्या पडलेल्या सळ्या एवढ्या धोकेदायक आहेत की या सळ्या वाहनाच्या टायर किंवा थेट दुचाकी चालकांच्या शरीरात घुसून मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याचा धोका आहे. मात्र एवढा धोका दिसत असताना देखील सबंधित ठेकेदार, त्यांची यंत्रणा आणि रस्तेविकास महामंडळाचे अधिकारी यांना ही कसे दिसत नाही ? का ही सर्वजण मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत? अशी चर्चा सुरू आहे.
अपघात झाल्यास ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर थेट सदोष मनुष्य वधा सारखे गुन्हे दाखल करावेत ! जर दुर्दैवाने या खड्ड्यांमुळे आणि उघड्या पडलेल्या लोखंडी सल्ल्यामुळे अपघात झाला; तर ठेकेदार अबू अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्य वधा सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हा दाखल करण्यात यावे.
दुरुस्ती शक्य नसेल तर सूचना फलक तरी लावा! : राष्ट्रीय महामार्गावरील अपूर्ण कामे आणि धोकेदायक खड्डे जर बुजविणे होत नसेल; तर त्या ठिकाणी सूचना फलक आणि साइन-ग्लो फलक लावल्यास वाहन चालकांच्या लक्षात येऊन अपघात तरी टळतील.