Beed accident | आष्टी तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; हायवा-कारच्या धडकेत मायलेकाचा होरपळून मृत्यू

या घटनेमुळे साळेगाव आणि आष्टी पंचायत समिती परिसरात शोककळा पसरली आहे
Beed accident | आष्टी तालुक्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात; हायवा-कारच्या धडकेत मायलेकाचा होरपळून मृत्यू
Published on
Updated on

आष्टी : तालुक्यातील कापसी फाटा परिसरात आज शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता काळजाचा थरकाप उडवणारा अपघात पाहायला मिळाला. एक हायवा डंपर आणि चारचाकी गाडी यांच्यात झालेल्या भीषण धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला. या आगीत कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही, ज्यामुळे मायलेकांचा गाडीतच होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताचा घटनाक्रम

आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कापसी फाट्यावर हा भीषण अपघात झाला. हायवा डंपर आणि चारचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, कारने क्षणात पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण कारला वेढले, त्यामुळे आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे कठीण झाले.

मृतदेहांची ओळख पटली

प्राथमिक माहितीनुसार, मृतांमध्ये आष्टी पंचायत समितीत कार्यरत असलेले ग्रामसेवक आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. ऋषिकेश श्रीहरी पुरी (रा. साळेगाव, ता. केज) – चालक, आई पुष्पा श्रीहरी पुरी असा मृतांची नावे आहेत.

भीषण दुर्घटनेत मायलेकांचा जागीच मृत्यू, परिसरात शोककळा

अपघात होताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी कारमध्ये अडकलेल्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीचे रौद्ररूप पाहता त्यांना यश आले नाही. या भीषण दुर्घटनेत मायलेकांचा जागीच मृत्यू झाल्याने केज आणि आष्टी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news