

MLA Prakash Solanke: Journalism in Majalgaon city is impartial.
माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा माजलगाव पत्रकार संघाने जोपासला असून माजलगावची पत्रकारिता निःपक्षपातीची असल्याचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सांगीतले तर आई वडिलांची सेवा करणा-यांना काशीसारखे तीर्थक्षेत्र करण्याची गरज नाही असल्याचे माजी आमदार बाजीराव जगताप यांनी सांगितले. माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने दर्पणसह विविध पुरस्कारांचे वितरण दि. ६ जानेवारी रोजी शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात मोठ्या थाटामाटात करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थांनी ज्येष्ठ पत्रकार उमेश मोगरेकर हे तर आमदार प्रकाश सोळंके, आयुष्मान भारतचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, सत्कारमूर्ती मा. आ. बाजीराव जगताप, मंगलाताई सोळंके, सुधाकर देशमुख, शेख अब्दुल सत्तार, नूतन नगराध्यक्षा शिफा चाउस, मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, बाबूराव पोटभरे, सहाल चाउस, दयानंद स्वामी, मिलिंद आवाड, शिरीष देशमुख, अनंतशास्त्री जोशी, उपसभापती श्रीहरी मोरे, अशोक डक, नितीन नाईकनवरे, सुनिता देशमुख यांची उपस्थिती होती. सिंदफणा पब्लिक स्कूलच्या संगीतमंचाने स्वागतगीत सादर करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास ओमप्रकाश मालपाणी, कल्याण आबुज, उपसभापती श्रीहरी मोरे, शेख मुख्तार, लक्ष्मीकांत देशमुख, शरद यादव, जीवन जगताप, रामभाऊ जगताप, बंडू खांडेकर, कचरू खळगे, एकनाथ मस्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष मुळी, कमलेश जाब्रस, दत्ता येवले, दिनकर शिंदे, महेंद्र मस्के, धनंजय माने, प्रसाद खोले, पांडुरंग कुलथे, अरबाज खान, दिगंबर सपकाळ यांच्यासह पत्रकार मित्रांनी पुढाकार घेतला.
यांचा झाला सन्मान
माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने यंदाचा दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुधाकर देशमुख, माजलगाव भूषण मा. आ. बाजीराव जगताप, समाजभूषण मंगलाताई सोळंके तर यशस्वी उद्योजक म्हणून शेख अब्दुल सत्तार तर विशेष सत्कार नूतन नगराध्यक्षा शिफा बिलाल चाउस यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, हार, पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.