minor girl case
minor girl case Pudhari

Beed Crime | केज तालुक्यात तेरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा शेतात विनयभंग

केज पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल
Published on

Kej taluka minor girl case

केज : केज तालुक्यात एका तेरा वर्षाच्या शाळकरी अल्पवयीन मुलीचा शेतात कोणी नसताना एका २० वर्ष वयाच्या तरुणाने विनयभंग केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवारी (दि. २१) दुपारी एक तेरा वर्षाची पीडित अल्पवयीन मुलगी ही शाळेला सुट्टी असल्याने तिच्या शेतात गेली होती. त्याच वेळी त्यांच्या शेजारी शेत असलेल्या बालाजी भांगे या तरुणाने तिच्या हाताला धरुन तिचा विनयभंग केला. जर हा प्रकार कुणाला सांगितला, तर जीवे मारण्याची धमकी दिली.

minor girl case
Beed News | केज उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा : आरोग्य विभागाविरुद्ध रुग्णांचा रोष

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून बालाजी दिलीप भांगे याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात पोक्सो कलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news