Minor Girl Assault Case |नात्याला काळिमा : अल्पवयीन बहिणीवर चुलत भावानेच केला अत्याचार

गर्भपात करणारी महिला डॉक्टर पोलिसांच्या रडारवर
Illustration of a child sitting with knees pulled close, with a dark shadow figure behind them on a red background.
Crime Against ChildrenPudhari
Published on
Updated on

Minor Girl Assault Case | A Stain on Family Ties: Cousin Brutally Assaults His Minor Sister

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात माणुसकीला आणि पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षीय भोळसर मुलीवर तिच्याच १४ वर्षीय चुलत भावाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला असून, या कृत्यामुळे पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिली होती. दरम्यान, पीडितेचा गर्भपात करून तिचा जीव धोक्यात घालणारी महिला डॉक्टर पोलिसांच्या रडारवर आहे.

Illustration of a child sitting with knees pulled close, with a dark shadow figure behind them on a red background.
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

पीडित मुलगी ही स्वभावतः भोळसर आहे. तिच्या याच असहायतेचा फायदा घेत तिच्या १४ वर्षीय चुलत भावाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने कुटुंबीयांनी तिला तपासणीसाठी माजलगाव येथील एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे तिची सोनोग्राफी केली असता, ती दोन महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. हा अहवाल पाहताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. अधिक चौकशी केली असता, चुलत भावानेच हे कृत्य केल्याचे निष्पन्न झाले.

घटनेचे गांभीर्य लक्षात न घेता आणि कायद्याची पायमल्ली करत, माजलगावमधील एका खासगी रुग्णालयात पीडितेचा गर्भपात घडवून आणण्यात आला. मात्र, या प्रक्रियेनंतर पीडितेची प्रकृती कमालीची खालावली.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला तातडीने अधिक उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर नसल्याचे समजते.

Illustration of a child sitting with knees pulled close, with a dark shadow figure behind them on a red background.
Beed Parli News: वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना; डॉक्टरांनी २२ तास मृत बाळ मातेच्या पोटातच ठेवले!

अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आणि पोलिसांना माहिती देणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित डॉक्टरने कोणत्याही नियमाचे पालन न करता गुपचूप गर्भपात उरकला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याने माजलगाव पोलिसांनी संबंधित डॉक्टरचा शोध घेण्यासाठी चक्र फिरवली आहेत. संबंधित डॉक्टरवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून माजलगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणारा मुलगा स्वतः अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप राठोड हे करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून, आरोपी आणि बेजबाबदार डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

डॉक्टरचा रक्तदाब वाढला

पीडितेच्या भोळसरपणाचा गैरफायदा घेत अल्पवयीन चुलत भावाने केलेल्या अत्याचारातून सदर पीडिता दोन महिन्यांची गर्भवती होती पोटात दुखू लागल्याने आई-वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेले असता ही बाब उघड झाली. त्यानंतर तिच्या नातेवाकांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात केला. सदर प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे गर्भपात करणारी महिला डॉक्टर आरोपी निष्पन्न झाली, यामुळे पोलिसांनी तत्काळ तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता तिचा बीपी अचानक वाढल्याने तिला जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या निगराणीखाली उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news