

परळी वैजनाथ : Santosh Deshmukh murder case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. याप्रकरणी आवादा कंपनीच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेला वाल्मिक कराड याच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मिक कराड याच्या आईने परळी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असलेले वाल्मिक कराड याच्यावर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा खोटा गुन्हा असून गलिच्छ राजकारणापायी माझ्या मुलावर अन्याय केला जात आहे. त्याच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घ्या. माझ्या मुलाला न्याय द्या, अशी मागणी करत वाल्मिक कराड याच्या ७५ वर्षाच्या आई पारुबाई बाबुराव कराड यांनी मंगळवारी सकाळपासून परळी शहर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केला आहे.