वाल्मीक कराड समर्थक दुसर्‍या दिवशीही आक्रमक; पांगरी येथे टॉवरवर चढून आंदोलन

Santosh Deshmukh Murder Case | कराडला न्याय देण्याची मागणी
Santosh Deshmukh Murder Case
वाल्मीक कराड समर्थक दुसर्‍या दिवशीही आक्रमक; पांगरी येथे टॉवरवर चढून आंदोलनfile photo
Published on
Updated on

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा : Santosh Deshmukh Murder Case | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याला मंगळवारी 'मोका' लावण्यात आला. कराड याच्या समर्थनार्थ काल दिवसभर समर्थकांनी आक्रमक आंदोलने केली. आज बुधवारी दुसर्‍या दिवशीही परळीच्या ग्रामीण भागात आंदोलने करण्यात आली. वाल्मीक कराडचे गाव असलेल्या पांगरी कॅम्प येथे रास्ता रोको करण्यात आला. यादरम्यान काही कार्यकर्त्यांनी मोबाईल टॉवरवर चढून जोरदार घोषणाबाजी केली.

वाल्मीक कराडच्या पांगरी गावात आज सकाळी पांगरी कॅम्प येथील बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून गावातील ५ समर्थक कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. वाल्मीक कराडला न्याय द्यावा आणि त्याच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे अशी मागणी करत ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. यावेळी आंदोलकांनी आमदार सुरेश धस व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news